कौटुंबिक वादातून जावयाने केलेल्या हल्ल्यात सासू आणि मेहुणी ठार; कोल्हापुरातील घटना

0
402

कोल्हापूर, दि. (पीसीबी) – कौटुंबिक वादातून जावयाने केलेल्या हल्ल्यात सासू आणि मेहुणी हे दोघे जागीच ठार झाले आहेत. या हल्ल्यात पत्नी आणि मेहुणा गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी सांगली येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, त्यांचीही प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जाते. कोल्हापुरात शनिवारी पहाटेच्या सुमारास शिरोळ तालुक्यातील यड्राव येथे ही घटना घडली.