कोरोना रोखण्यासाठी उद्योजक आनंद महिंद्रा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘ही’ सुचना केली…

0
256

मुंबई, दि. १६ (पीसीबी) – देशात तसेच राज्यातही कोरोना रूग्णांच्या संख्येत पुन्हा झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. देशात सर्वाधिक सापडणाऱ्या नव्या कोरोना रूग्णांमध्ये महाराष्ट्र पहिल्या नंबरवर आहे. याच पार्श्वभूमीवरून उद्योजक आनंद महिंद्रा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्याकडे एक मागणी केली आहे.

कोरोना रूग्णांची संख्या पाहता महाराष्ट्रात सरसकट सर्वांना लसीकरणाला परवानगी देण्यात यावी, अशी मागणी आनंद महिंद्रा यांनी केली आहे. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे. रोज सापडणाऱ्या नव्या रुग्णांपैकी अर्ध्याहून अधिक महाराष्ट्रातील आहेत. महाराष्ट्र राज्य हे देशाच्या आर्थिक क्षेत्राच्या केंद्रस्थानी आहे. आणखीन लॉकडाउन राज्याला आर्थिक दुष्ट्या कमकुवत करणारे ठरतील, असं आनंद महिंद्रा म्हणाले. ज्यांना ज्यांना लस घेण्याची इच्छा आहे अशा सर्वांना लसीकरणाची तातडीची परवानगी देण्याची गरज महाराष्ट्रात आहे. लसींची कमतरता नाहीये, असं महिंद्रांनी म्हटलंय.

दरम्यान, कोरोना रूग्णांच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं नवी नियमावली जाहीर केलीय. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ही नवी नियमावली जारी करण्यात आलीय. नव्या नियमावलीनुसार लग्न सोहळ्यात फक्त 50 लोकांना परवानगी असेल. ही नवी नियमावली 31 मार्च 2021 पर्यंत लागू राहणार आहे.