सचिन वाझे प्रकरणी वर्षा बंगल्यावर महत्वाची चर्चा

0
210

मुंबई, दि. १६ (पीसीबी) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या वर्षा निवासस्थानी महत्त्वाची बैठक पार पडत आहे. या बैठकीला महाविकासआघाडीतील महत्त्वाचे नेते उपस्थितीत आहे. या बैठकीत सचिन वाझे प्रकरणी चर्चा सुरु असल्याची माहिती मिळत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी 9 वाजता या बैठकीला सुरुवात झाली आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, बाळसाहेब थोरात, जयंत पाटील, अनिल परब उपस्थित आहेत. या बैठकीत सचिन वाझे प्रकरणी चर्चा होण्याची शक्यता आहे. महाविकासआघाडीच्या प्रतिमा सावरण्यासाठी तारेवरची कसरत सुरु झाली आहे. सचिन वाझे प्रकरणी सरकारवर अनेक आरोप होत आहे.

मुंबई पोलिसातील एक वादग्रस्त अधिकारीला पुन्हा पोलीस दलात घेण्यात आले. मात्र अंबानी स्फोट प्रकरणी त्यांचं नाव येत आहे. NIA ने त्यांना अटक केली आहे. त्यामुळे आता सरकारच्या प्रतिमेचा प्रश्न आहे. ती सावरण्यासाठी महाविकासआघाडीची महत्त्वाची बैठक पार पडत आहे. या बैठकीत अजित पवार, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, अनिल परब सहभागी झाले आहेत.

शरद पवार- उद्धव ठाकरेंची बैठक
तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. सरकारने नेमंक या प्रकरणी काय भूमिका घ्यायची शरद पवारांचा प्रदीर्घ राजकीय अनुभव आहे तो पाहता, मुंबई पोलीस दलातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच NIA कडून काही पोलीस अधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलवलं जाण्याची शक्यता आहेत. त्यामुळे आजच्या बैठकीत सचिन वाझे प्रकरणी रणनीती ठरणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.