कच्छच्या सीमेवर भारताने पाकिस्तानचे ड्रोन पाडले   

0
604

नवी दिल्ली, दि. २६ (पीसीबी) – भारतीय हवाई दलाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळांवर १ हजार किलोचे बॉम्ब फेकले. त्यानंतर  आणखी एक  कारवाई केल्याची   माहिती समोर आली आहे. गुजरातमध्ये कच्छच्या सीमेवर भारताने पाकिस्तानचे एक ड्रोन  पाडल्याची वृत्त समोर आले  आहे.

कच्छच्या सीमेवर आज (मंगळवार) सकाळी  ६.३० च्या सुमारास हे ड्रोन घिरट्या घालत होते. त्यानंतर त्याला तातडीने पाडण्यात आले. भारताने पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राइक कारवाईचाच हा देखील एक भाग होता किंवा अन्य काही, याबाबत अद्याप अधिकृत कोणतीही माहिती  समजू शकलेली नाही.

दरम्यान, भारताने  केलेल्या हल्ल्यात  दहशतवाद्यांचे अनेक  तळ उद्‌ध्वस्त झाले आहेत.   भारतीय वायुदलाने आज पहाटे ३.३० वाजता  ही कारवाई केली आहे.   हवाईदलाच्या १२  विमानांनी ही कारवाई केली. पठाणकोट एअरबेस आणि मध्य भारतातून हवाईदलाच्या विमानांनी उड्डान केले. मिराज २००० या विमानांनी पाकिस्तानी रडारला चकवा देत ही कारवाई केली.