एनसीबीची मोठी कारवाई; सोलापूर-पुणे महामार्गावर गांजा जप्त

0
203

पुणे दि. १ (पीसीबी) – महाराष्ट्रात एनसीबीने एत मोठी कारवाई केली आहे. सोलापूर-पुणे महामार्गावर एका वाहनातून तब्बल 54 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली आहे. पोलिस यांची कसून चौकशी करत आहेत. या कारवाईमुळे ड्रग्ज माफियांचे धाबे दणाणले आहेत.

महाराष्ट्रात एनसीबीने मोठी कारवाई केली आहे. कळवू इच्छितो की, सोलापूर-पुणे महामार्गावर NCB ने एका वाहनातून 54 किलो गांजा जप्त केला आहे. तसेच या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे मात्र उघड करण्यात आलेली नाहीत. अटक आरोपींची पोलीस चौकशी करत आहेत.

सोलापूर-पुणे महामार्गावरुन अवैध पद्धतीने गांजाची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती एनसीबीला मिळाली होती. त्यानुसार एनसीबीच्या टीमने सापळा रचून गांजाची तस्करी करण्यात येत असलेले वाहन पकडले. तब्बल 54 किलो गांजा हस्तगत करण्यात आला आहे. याची किंमत जवळपास 85 लाखच्या आसपास आहे.

पोलिसांनी या प्रकरणी दोन तस्करांना अटक देखील केली आहे. हा गांजा ओडिशा राज्यातून आणला होता. या नंतर गा सर्व माल मुंबई, सुरत आणि इतर आसपासच्या भागातील पेडलर्सना वितरित करण्याची तस्करचा प्लान होता.

मात्र, हा माल वितरीत होण्याआधीच एनसीबीने धडक कारवाई केली आहे. यापूर्वीही पुणे-सोलापूर महामार्गावर एनसीबीने २० किलो गांजा जप्त केला होता. यासोबतच दुचाकीसह चार लाख तीन हजार रुपयांचा मालही जप्त करण्यात आला होता.

नुकतेच एनसीबीने आंतरराज्य ड्रग सिंडिकेटचा पर्दाफाश केला होता. सोलापूर-मुंबई महामार्गावर एका वाहनातून सुमारे 286 किलो गांजा एनसीहीने तस्करांकडून जप्त केला होता. ज्याचे बाजारमूल्य साडेतीन कोटी रुपये होते. यासोबतच एनसीबीने दोघांना अटकही केली होती.