एकही पैसा बुडणार नाही, पै न् पै परत दिली जाईल – अर्थमंत्री सीतारामन

0
332
दिल्ली, दि.७ (पीसीबी) – नव्या पिढीची खासगी बँक असलेल्या येस बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून, तिच्या आर्थिक व्यवहारांवर रिझव्‍‌र्ह बँकेने निर्बंध आणल्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषेद घेऊन येस बँकेतील ठेवीदारांचा एकही पैसा बुडणार नाही, पै न् पै परत दिली जाईल. माध्यमांशी बोलताना म्हणाले.
सीतारामन पुढे म्हणाले, येस बँकेच्या बिकट आर्थिक स्थितीचे खापर सीतारामन यांनी यूपीए सरकारवर फोडले. बँकेतील आर्थिक समस्या काँग्रेस सरकारच्या काळात उद्भवल्या असल्याचा आरोप त्यांनी केला. येस बँकेच्या संकटाला आम्ही जबाबदार असल्याचे विरोधक सांगत आहेत. विनाकारण त्यांच्यावर आरोप करायचे नाहीत पण, त्यांनी तसे कारण दिलेले आहे. २००४ ते २०१४ या काळात यूपीए सरकारच्या बँकिंग क्षेत्राच्या हाताळणीमुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत, अशी टीका सीतारामन यांनी केली.
या बँकेने अनिल अंबानी समूह, एस्सेल समूह, व्होडाफोन, सीसीडी, आयएलएफएस अशा मोठय़ा कंपन्यांना कर्ज दिले होते. आता ते थकीत बनले आहे. या कर्जाची वेळेवर वसुली करता न आल्याने येस बँक अडचणीत आली आहे. ही सर्व कर्जे २०१४ मध्ये म्हणजे यूपीए सरकारची केंद्रात सत्ता असताना दिली गेली. २०१७ पासून रिझव्‍‌र्ह बँकेचे येस बँकेच्या आर्थिक व्यवहारांवर लक्ष होते. या काळात प्रशासनाकडून झालेल्या चुका, कमकुवत व्यवस्थापन यांची माहिती रिझव्‍‌र्ह बँकेला तसेच तपास यंत्रणानाही आहे. शिखर बँकेने २०१८ मध्ये येस बँकेचे संचालक मंडळ बदलण्याचा निर्णय घेतला होता, अशी माहिती सीतारामन यांनी दिली.