एआयएसएसएमएस संस्थेच्या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांना युपीएससीचे धडे

0
593

पुणे, दि. २० (पीसीबी) – शिवाजीनगर येथील ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरिअल सोसायटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी महाविद्यालयात एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना अनेक महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यशाळेला प्रमुख पाहुणे म्हणून युनिक अकादमी पुणेचे अमृता ठुशे आणि भूषण पाटील उपस्थित होते. ठुसे आणि पाटील यांनी युपीएससी परीक्षेच्या वैकल्पिक विषयांसंबंधी महत्वाची माहिती विद्यार्थ्यांना दिली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. बी. माने यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यशाळेचे आयोजन महाविद्यालयाच्या स्टडी सर्कल ग्रुपने केले होते.