भीम आर्मीच्या वतीने वाकडमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

0
699

चिंचवड, दि. २० (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहर भीम आर्मीच्या वतीने वाकड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त विविध उपक्रम राबवण्यात आले.

भीम आर्मी संघटनेकडून छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे रयत विद्यार्थी विचार मंच या सामाजिक व शैक्षणिक संस्थेस शैक्षणिक वस्तूंची भेट देण्यात आली.

यावेळी भीम आर्मीचे शहराध्यक्ष अंतिम जाधव, उपाध्यक्ष सुमित वाघमारे, सरचिटणीस भैय्यासाहेब गजधने, संघटक वैभव सावंत, शुभम कांबळे, अजय भंडारी, गौरव बनसोडे, महेश बिराजदार, राजकुमार कांबळे, बाळकृष्ण सातपुते, अंजना गायकवाड, मेघा आठवले, संतोष शिंदे, संजय भारती आदी उपस्थित होते.