एआयएसएसएमएसच्या डॉ. गौरी प्रभू यांचा सर्वोत्तम प्राध्यापक राष्ट्रीय पुरस्काराने गौरव

0
709

पुणे, दि. २५ (पीसीबी) – नेसकॉमच्या वतीने शिवाजीनगर येथील एआयएसएसएमएस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या प्राध्यापिका डॉ. गौरी प्रभु यांना सर्वोत्तम प्राध्यापक या राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले.

नेसकॉमच्या वार्षिक पुरस्कार सोहळ्यात विविध क्षेत्रात चांगली कामगिरी करणाऱ्यांना पुरस्काराने गौरवण्यात आले. या कार्यक्रमात एआयएसएसएमएस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या प्राध्यापिका डॉ. गौरी प्रभु यांना वित्त विषयातील सर्वोत्तम प्राध्यापक देवांग मेहता शिक्षण राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला.

हा पुरस्कार प्रत्येक वर्षी नेसकॉमचे अध्यक्ष देवांग मेहता यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येतो. देवांग मेहता नॅशनल एजुकेशन अवॉर्ड हा भारतातील सर्वात मोठा शैक्षणिक पुरस्कार आहे. जगभरातील विविध क्षेत्रातील नामवंत व्यावसायिक व्यक्तींच्या कार्याचा आढावा घेऊन पुरस्कारार्थीचे नाव निश्चित केले जाते.