थेरगावातील जाणता राजा प्रतिष्ठानच्या नवरात्रौत्सवाची कोजागिरी पौर्णिमेला महाप्रसादाने सांगता

0
896

चिंचवड, दि. २५ (पीसीबी) – थेरगाव, दत्तनगर येथील जाणता राजा प्रतिष्ठानकडून आयोजित करण्यात आलेल्या नवरात्रौत्सवाची सांगता कोजागिरी पौर्णिमेला महाप्रसादाच्या आयोजनाने झाली.

जाणता राजा प्रतिष्ठानकडून दरवर्षी नवरात्रौत्सवाचे आयोजन केले जाते. नऊ दिवस दांडी, रास-गरबाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. माजी नगरसेवक सिद्धेश्वर बारणे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या १२ वर्षापासून या नवरात्रौत्सवाचे आयोजन केले जाते. यंदाही प्रतिष्ठानच्या नवरात्रौत्सवाला नागरिकांचा तुफान प्रतिसाद मिळाला. प्रतिष्ठानच्या या नवरात्रौत्सवाची सांगता कोजागिरी पौर्णिमेला महाप्रसादाच्या आयोजनाने झाली. यावेळी नगरसेविका झामाबाई बारणे व नागरिक उपस्थित होते.