उध्दव ठाकरेंचे सर्व उजवे-डावे शिंदे गटात

0
211

– केसरकर, जैस्वाल, सरवणकर

मुंबई, दि. २३ (पीसीबी) – सत्तेचा सस्पेन्स वाढत असून सुरतेतील आमदार आसामच्या गुवाहटीला पोहोचल्यानंतर मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे यांनी थेट उद्धव ठाकरे आणि पर्यायानं महाविकास आघाडी सरकारला चॅलेंज केलंय. जवळपास ४० आमदार सोबत असल्याचा दावा त्यांनी केलाय. सेनेला मोठं भगदाड पाडलं. स्वत: प्रतोद नेमला आणि खरी शिवसेना त्यांच्यासोबत असल्याचं म्हटलं. यानंतर राज्यातील सत्ताकेंद्र बदलल्याचं स्पष्ट झालंय. ठाकरे यांचे उजवे-डावे समजले जाणारे दीपक केसरकर, आशिष जैस्वाल, सजा सरवणकर हे सगळेच शिंदे गटात सामिल झाले आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या सगळ्यात जवळचे चेहरे शिंदे गटात ! –
आणखी चार आमदारांसोबत आशिष जैस्वाल गुवाहाटी पोहोचत असल्याची माहिती मिळतीय. त्यामुळे शिंदे यांनी सांगितलेला ४० आमदारांचा आकडा आता पूर्ण होणार असल्याचं दिसतंय. अपक्षांसह हा आकडा ५० वर गेला आहे. शिवसेना समर्थित अपक्ष आमदार आशिष जैसवाल नॅाटरिचेबल होते. मंत्री टक्केवारी मागत असल्याचा गौप्यस्फोट करुन उडवून दिली होती खळबळ आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जवळचे आमदार म्हणून जैसवाल यांची ओळख आहे. मंत्री गुलाबराव पाटलांनंतर शिवसेनेला आज सकाळी आणखी एक धक्का बसलाय. कोकणातील सेनेचे नेते दीपक केसरकर यांनी एका मुलाखतीत आपण शिंदे यांच्या मताशी सहमत असल्याचे सांगत गेली दोन वर्षे या विषयाचा पाठपुरावा करत असल्याचे सांगितले. आता ते गुवाहाटीत एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत. यामुळं दिवसेंदिवस एकनाथ शिंदे यांची ताकद आणखी वाढत असल्याचं स्पष्ट झालंय. शिवसेनेचे नेते दीपक केसरकर गुवाहाटीत, एकनाथ शिंदेंच्या गटात झाले सामील.