उद्धव यांनी सहकुटुंब घेतले रामलल्लाचे दर्शन

0
587

अयोध्या, दि. २५ (पीसीबी) – उद्धव ठाकरे सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास राम जन्मभूमीवर जाऊन रामलल्लाचे दर्शन घेणार आहेत. शिवनेरी किल्ल्यावरील मातीचा कलश रामजन्मभूमीवर ठेऊन ते मंदिर निर्माणाचा संकल्प सोडणार आहेत. यावेळी संत-महंत, स्थानिक नेते अशा मोजक्याच मंडळींना रामजन्मभूमीवर प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती पहाऱ्यावरील पोलिसांकडून देण्यात आली.

सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेला संबोधित करणार आहेत.