उद्धव ठाकरेंचा कोकण दौरा नसून पर्यटन दौरा आहे – नितेश राणे

0
380

मुंबई, दि.१७ (पीसीबी) – राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजपासून दोन दिवसाच्या कोकण दौऱ्यावर येत आहेत. रायगड, रत्नागिरी आणि त्यानंतर ते सिंधुदुर्गला जाणार आहेत. सकाळी रायगड दौऱ्यानंतर ते रत्नागिरील्या गणपतीपुळे इथे दाखल होणार आहेत. गणपतीपुळेत आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सुरुवातीला श्रींचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर विकास आराखड्यातील प्रमुख कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे.

भाजप आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या कोकण दौऱ्यावर टीका केली आहे. ते याबाबत मराठी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, ‘उद्धव ठाकरेंचा कोकण दौरा नसून पर्यटन दौरा आहे,’ असा टोला त्यांनी येथे बोलताना लगावला.

पुढे बोलताना राणे म्हणाले, ‘अवकाळी पावसाची नुकसान भरपाई अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे जे करायचं ते केले नसल्याचे म्हणत राणेंनी नाराजी व्यक्त केली. ‘तुमचे सरकार तुम्ही चालवा पण, कोकणी जनतेला शांतपणे जगू द्या, असे आमदार नितेश राणे म्हणाले.