इलेक्ट्रिक वायरला स्पर्श करणा-या झाडांच्या फांद्या तोडणा-या वायरमनला मारहाण

0
343

पिंपरी, दि. २० (पीसीबी) – इलेक्ट्रिक ट्रान्सफोर्मर जवळ असलेल्या झाडाच्या फांद्या इलेक्ट्रिक वायरला स्पर्श करत असल्याने अशा फांद्या तोडत असलेल्या वायरमनला एकाने मारहाण केली. ही घटना गुरुवारी (दि. 19) सकाळी पावणे बारा वाजता पिंपरी येथे घडली.

नागराज शंकर भांडेकर (वय 45, रा. गांधीनगर झोपडपट्टी, पिंपरी) या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी रामेश्वर बळीराम वाघमारे (वय 32) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे शासनाच्या परिपत्रकानुसार ज्या झाडांच्या फांद्या इलेक्ट्रिकल वायरला स्पर्श करून धोका निर्माण होऊ शकतो, अशा फांद्या कट करण्याचे काम करीत होते. महापालिकेच्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक ग्रंथालयाच्या मागे असलेल्या ट्रान्सफॉर्मरच्या आवारात ट्रान्सफॉर्मरला स्पर्श करणा-या झाडाच्या फांद्यांची छाटणी करत असताना आरोपी तिथे आला. तुम्ही झाडाच्या फांद्या कोणाच्या आदेशाने कट करत आहेत, असे म्हणत आरोपीने फिर्यादी यांना शिवीगाळ करून लाकडी दांडक्याने मारहाण केली. यात फिर्यादी जखमी झाले आहेत. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.