आपल्याला ‘या’ शारीरिक त्रासापासून दूर ठेवते डाळिंबाचे फळ

0
574

डॉक्टर नेहमी सांगतात कि, ऋतू नुसार फलाहार घेणे आपल्या शरीरासाठी आरोग्यदायी असते. कारण त्यामुळेच आपली शारीरिक क्षमता ठरत असते. आपल्या शरीराच्या योग्य वाढीसाठी भाज्या, कडधान्य, फळ यांचं सेवन करणं महत्वाचं आहे. कारण प्रत्येक गोष्टींमध्ये काही खास गुणधर्म असतात. जे शरीरासाठी फायदेशीर असतात. त्यामुळे आज आपण डाळींब, संत्री अशी सालं काढून खाण्याची फळं का महत्वाची आहे हे पाहणार आहोत..

डाळींब खाण्याचे फायदे;-

१. चेहऱ्यावरील तेज वाढते.सुरकुतलेल्या त्वचेवरती डाळिंब गुणकारी आहे.

२. अपचन, आम्लपित्ताचा त्रास कमी होतो डाळिंब सेवनाने कमी हिण्यास मदत होते.

३. डाळिंब सेवनाने रोग प्रतिकारक शक्ती वाढते. रोगप्रतिकारकशक्ती वाढते.

४. मूळव्याधीचा त्रास डाळिंब सेवनाने कमी होतो.

५.डाळिंबाच्या सालीच्या काढय़ाने गुळण्या केल्याने घसा दुखणे, तोंड येणे हे आजार बरे होतात.

६. डाळिंब खाल्ल्याने शरीरातील रक्ताची कमतरता भरुन निघते.

७. ताप आल्यास डाळींब खावं. त्यामुळे शरीरातील उष्णता कमी होते.

८. हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यासाठी डाळिंब खावे.

९. जुनाट खोकला नाहीसा होतो.

१०. जुलाबाचा त्रास होत असेल तर डाळिंबाच्या सेवनाने ते लगेच थांबतात.

११. अपचन, पोटात गॅस होणे, शौचास साफ न होणे या तक्रारींवर डाळिंब फायदेशीर ठरते.

१२. रक्ताभिसरण क्रिया सुधारते.