भारतातील ‘या’ १० मजेशीर आणि आश्चर्यजनक रंजक गोष्टी ज्या माहित असायला हव्यात…

0
604

भारत हि आपली मायभूमी आहे..तिची वेगवेगळी खासियत आहे…त्याच प्रमाणे आपल्या भारतामध्ये काही अशा रंजक गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहित असायलाच हव्यात…

१)चंद्रावर पाणीचंद्रावर पाण्याचे अस्तित्व असल्याचा सर्वात पहिला शोध सप्टेंबर 2009 मध्ये भारताच्या इसरो चांद्रयान-1 मोहिमेत Moon Mineralogy Mapper ने आधी लावला.

२)सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण मावसिनराम
सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण मावसिनराम हे मेघालयातील खासी टेकड्यांमधील एक छोटेसे गाव आहे. जिथे सर्वाधिक पाऊस पडल्याने ते जगाच्या नकाशावर प्रसिद्ध झाले आहे. 1861 मध्ये येथे सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे.

३)शाकाहारी भारत
भारतात आपण वेगवेगळे विचार, रूढी, पंपर पाळतो. शिवाय भारत हा इतर देशांच्या तुलनेत अध्यात्मावर जास्त विश्वास ठेवतो. आणि सर्व धार्मिक कारणांमुळे किंवा आवडीचा विषय असल्याने म्हणा पण भारत हा जगात सर्वात जास्त शाकाहारी व्यक्तिनिव्यापलेला देश मानला जातो.

४)राष्ट्रीय कबड्डी संघाने जिंकले सगळे विश्वकप
आजपर्यंत झालेले 5 ही पुरुष कबड्डी विश्वकप हे भारताने जिंकले आहेत. या व्यतिरिक्त भारतीय महिला कबड्डी संघाने देखील आजवरचे सर्व विश्वकप जिंकून बाजी मारली आहे.

५)प्रथम राष्ट्रपती पगाराच्या केवळ 50% रक्कम घेत
भारताचे राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद जेव्हा राष्ट्रपती झाले तेव्हा ते आपल्या पगाराच्या फक्त ५० टक्के रक्कम स्वीकारत होते. त्यावेळी राष्ट्रपतींचा पगार हा 10,000 रुपये एवढा होता. एवढ्या रकमेपेक्षा जास्त रक्कम नको असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होत. नंतर आपल्या 12 वर्षांच्या काळात त्यांनी पगाराच्या केवळ २५ टक्केच रक्कम स्वीकारली.

६)भारतातील पहिले रॉकेट सायकल वरून नेण्यात आले
भारतातील पहीले रॉकेट हे वजनाने हलके आणि आकाराने लहान असल्या कारणाने त्याला सायकलवरून नेण्याची सोया केली गेली. तिरुवनंतपूरम येथे थूंबा या स्पेस सेंटर हे रॉकेट ही व्यक्ती सहज घेऊन चाललीये ते आपण पाहतोय.

७)इंग्लिश बोलणारा देश भारत
आजकाल सर्रास पणे इंग्रजी बोलली जाते. त्यामुळे असं म्हंटल जात कि अमेरिकेनंतर भारत हा इंग्लिश बोलणारा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. जवळजवळ साडे बारा करोड लोक बोलण्यात इंग्रजीचा वापर करतात. वाढत्या आणि बदलत्या काळानुसार हा एकदा देखील वाढणार यात शंका नाही.

 

८) पाण्यावर तरंगते पोस्ट ऑफिस:
भारतातील पोस्टाचे नेटवर्क हे सर्वात मोठे आहे. हे जाळे तब्बल 1,55,015 डाक घरांचे आहे. जर या पैकीच एक रोचक गोष्ट कि पाण्यावर तरंगणारे पोस्ट ऑफिस तुम्हाला पहायचे असेल तर तुम्हाला श्रीनगर ला जावे लागेल. कारण इथे पाण्यावर तरंगणारे डाक घर श्रीनगर इथे दल सरोवरात 11 ऑगस्ट 2011 ला सुरु झाले.

९)महिला कॅल्क्युलेटर
भारतातील मानवी कॅल्क्युलेटर म्हणून शकुंतला देवी या ओळखल्या जातात. त्याचे कारण आहे कि, 13 आकडी संख्येच्या गुणाकाराचे उत्तर त्या अवघ्या 28 सेकंदात अगदी न चुकता देतात. आणि अशी महान व्यक्ती भारतीय आहे हि आपल्या देशाकरता कौतुक आणि अभिमानाचीगोष्ट आहे.

१०)साखर वापरणारा पहिला देश भारत
भारत हा कृषी प्रधान देश आहे. भारत हा साखरेचे निष्कर्षण आणि शुद्धीकरण तंत्र विकसित करणारा पहिला देश ठरला आहे. अनेक विदेशी नागरिक साखरेचे शुद्धीकरण तंत्र आणि साखरेच्या निर्मिताचा अभ्यास करण्याकरता भारताला भेट देत असतात.