आक्षेपार्ह विधानाप्रकरणी हार्दिक पंड्या आणि लोकेश राहुल यांना २० लाखांचा दंड

0
688

मुंबई , दि. २० (पीसीबी) – ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये महिलांबाबत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी भारताचा  क्रिकेटपटू हार्दिक पंड्या आणि लोकेश राहुल यांना प्रत्येकी २० लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.  याबाबत बीसीसीआयचे लोकपाल डी के जैन यांनी  आदेश दिले आहेत.

हार्दिक आणि राहुल यांना ठोठावलेल्या २० लाखातील १० लाख हे शहीद झालेल्या निमलष्करी दलातील जवानांच्या कुटुंबीयांना देण्यात येणार आहेत.  दहा कुटुंबांना प्रत्येकी एक लाखांची मदत करण्याचे आदेश लोकपालांनी दिले आहेत. तर उर्वरित दहा लाखांची रक्कम अंध क्रिकेट निधी आणि प्रसिद्धीसाठी देण्यात येणार आहे.

पुढील चार आठवड्यात दोघे दंडाची रक्कम देण्यास असमर्थ ठरल्यास सामन्यांच्या मानधनातून दंडाची रक्कम कापण्यात येईल, असेही लोकपालांनी स्पष्ट केले आहे. देशात क्रिकेटरकडे रोल मॉडेल म्हणून पाहिले जात आहे. त्यामुळे त्यांनी केलेल्या बेजबाबदार वक्तव्यांविषयी लोकपालांनी खंत व्यक्त केली.