अहमदनगरमध्ये बॉम्बस्फोट; दोघांचा जागीच मृत्यू

0
706

अहमदनगर, दि. १० (पीसीबी) – खारे कर्जुने गावाजवळ के.के. रेंज येथील लष्कराच्या सरावाचा बॉम्ब फोडून त्यातील धातू काढत असताना स्फोट झाला. या स्फोटात दोनजणांचा जागीच मृत्यू झाला.

अक्षय नवनाथ गायकवाड (वय १९) आणि संदीप भाऊ साहेब तिरवडे (वय ३२, रा. खारे कर्जुने) अशी मृत दोघांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, नगरच्या खारे कर्जुने गावाजवळ लष्कराचे के.के. रेंज आहे. लष्करी सराव झाल्यानंतर हे दोघेही बॉम्बचे भंगार शोधण्यासाठी रात्री केके रेंजमध्ये गेले होते. त्यावेळी निकामी झालेला समजून बॉम्ब त्यांनी घेतला. हा बॉम्ब फोडून त्यातील धातू काढण्याचा त्यांचा प्रयत्न होता. त्यावेळी त्याचा स्फोट झाला. यामध्ये अक्षय आणि संदीप या दोघांचाही मृत्यू झाला आहे.