अति उकळल्यावर दूधच का उतू जात… पाणी का नाही?

0
325

किचन मध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे स्वछता. कारण घरातील आरोग्य हे त्या घरातील स्वछतेवरून ठरत.. आणि घरातील स्वछता हि त्या घरातील स्वयंपाकघरावरून. गृहिणीला घरातील आणि स्वयंपाकघरातील स्वछता राखणे गरजेचे असते. पण जेवढ्या सहजतेने बोलू तितके ते सोप्पे नसते. किचन मधील सगळ्या गोष्टींकडे जातीने लक्ष देणे गरजेचे असते. पण आपण हा कधी विचार केलाय का कि, किचन मधील सर्वात महत्वाचा असलेला द्रव पदार्थ दूध हा उतू का जातो? जेव्हा कि पाणी सुद्धा द्रव पदार्थ आहे मग पाणी का उतू जात नाही. या मागे काय कारण आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत..दूध आणि पाणी हे दोन्ही द्रव पदार्थ आहेत. परंतु दूध पाण्यासारखे साधे द्रव नसते तर ते कोलाइडल आहे. ज्यामध्ये प्रथिने, चरबी, साखर, व्हिटॅमिन आणि खनिजे सारखे अनेक पदार्थ असतात.

त्यामुळे जास्त गरम केल्यावर दूध उतू जायचे कारण असे आहे की, दूध गरम केल्यावर जास्त उष्णतेमुळे त्यामधून प्रथिन आणि चरबी वेगवेगळे होतात आणि हे हलकं असल्यामुळे ते दुधाच्या पृष्ठभागावर एकत्र होतात. दुधात पाण्याचे प्रमाण अधिक असतात. जे वाफेच्या रूपात वर उडून जातात. पण दुधाच्या पृष्ठभागावर तयार झालेल्या थरातून बाहेर येत नाही. जर या स्थितीत देखील दूध गरम होत राहिले तर वाफ वेगाने वर जाते आणि बुडबुड्याच्या रूपात फेस तयार करत आणि अशा परिस्थितीत दूध उतू जात.

दूध उतू जाऊ नये यासाठी दुधाच्या भांड्यात एक लांब चमचा घालून ठेवा. असं केल्यानं दुधावर जमलेली साय च्या खाली वाफ जमत नाही आणि वाफ बाहेर निघेल. त्यामुळे दूध उतू जाणार नाही.