टेबल टेनिस स्पर्धेत सिद्धेश पांडे पुरुष एकेरीचा विजेता

0
438

मुंबई,दि.२९(पीसीबी) : ठाण्याचा पाचवा मानांकित सिद्धेश पांडे याने जबरदस्त खेळाचे प्रदर्शन करताना ८२व्या राज्य अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीचे विजेतेपद मिळविले. अंतिम फेरीच्या लढतीत त्याने मुंबई उपनगरच्या चौथ्या मानांकित चिन्मय सोमय्याचा १२-१०, ११-५, ९-११, ९-११, ११-७, ११-६ असा पराभव केला.

सिद्धेशची सुरवात फारशी चांगली नव्हती. पहिल्या गेमला तो एकवेळ ४-१० असा पिछाडीवर होता. पण, त्यानंतर त्याने जबरदस्त आक्रमक खेळ करताना सलग आठ गुण जिंकताना पहिली गेम जिंकली. त्यानंतर दुसऱ्या गेमला त्याने सहज सरशी साधली. पण, नंतर त्याला दोन गेम गमवाव्या लागल्या. सामना रंगणार असे वाटत असताना सिद्धेशने पुन्हा एकदा आक्रमक होत सलग दोन गेम जिंकताना विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

त्यापूर्वी, उपांत्य फेरीत त्याने आपले सर्वस्व पणाला लावत अव्वल मानांकित सनिल शेट्टी याचे आव्हान ११-८, ८-११, १५-१३, १२-१०, १०-१२,४-११, ११-४ असे संपुष्टात आणले. दुसऱ्या उपांत्य लढतीत चिन्मयला देखिल आपल्याच संघाच्या शिवम दासचा प्रतिकार सहन करावा लागला. सहा गेमच्या लढतीनंतर त्याने ७-११, १३-११, ११-७, १४-१६, १४-१२, ११-३ असा विजय मिळविला.

पुरुष एकेरी निकाल :
उपांत्यपूर्व फेरी :
सनील शेट्टी वि. वि.जुबिन तारापुरवाला 11-5, 11-7, 11-6, 10-12, 11-7, सिद्धेश पांडे वि. वि. दीपीत पाटील 11-5,11-6, 8-11, 11-8, 11-6, चिन्मय सोमय्या वि. वि.मंदार हर्डीकर 11-7,11-4, 7-11, 11-3,9-11, 15-13,शिवम दास वि. वि.रविंद्र कोटीयन 6-11,13-11, 11-9,4-11,11-7,11-6, 11-7

उपांत्यफेरी :
सिद्धेश पांडे वि. वि.सनील शेट्टी 11-8,8-11,15-13, 12-10,10-12,4-11, 11-4, चिन्मय सोमय्या वि. वि.शिवम दास 7-11,13-11, 11-7,14-16,14-12,11-3

अंतिम फेरी :
सिद्धेश पांडे वि. वि. चिन्मय सोमय्या 12-10,11-5,9-11, 9-11,11-7,11-6