अजितदादा पवार शहरातील सोसायटीधारकांच्या समस्या घेणार जाणून

0
212

पिंपरी दि. ३० (पीसीबी) – बांधकाम व्यावसायिकांकडून करारनाम्यातील अटी-शर्तीचे पालन न करणे, बांधकाम संस्थेचे अभिहस्तांतरण विलेख न करणे, पूर्णत्वाचा दाखला न मिळणे, महापालिकेकडून अपुरा पाणी पुरवठा होणे, सहकार विभागकडून सोसायटीची नोंदणी विलंबाने होणे, भाग प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ करणे, ऑडीटच्या नावाखाली छळवणूक करणे या सारख्या विविध समस्या सोडविण्यासाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार पिंपरी-चिंचवड शहरातील सोसायटीधारकांशी संवाद साधणार आहेत.

याबाबतची माहिती राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी दिली. अजितदादा 5 ऑक्‍टोबर 2022 रोजी सकाळी आठ वाजता थेरगाव येथील संतोष मंगल कार्यालयात सोसायटी धारकांशी संवाद साधणार आहेत. माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी नगरसेवक मयूर कलाटे, प्रशांत शितोळे, युवकचे शहराध्यक्ष इम्रान शेख, वर्षा जगताप, फजल शेख आदी पदाधिकारी पत्रकार परिषदेला उपस्थित होते.

शहराध्यक्ष गव्हाणे म्हणाले, शहरातील गृहनिर्माण सोसायटीधारकांना विविध समस्या आहेत. रेरा कायद्यामुळे बांधकाम व्यावसायिकांनी ग्राहकांना दिलेली आश्‍वासने पाळावीच लागत आहेत. मात्र, त्यानंतरही काही बांधकाम व्यावसायिक ग्राहकांचे प्रश्‍न प्रलंबित ठेवत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. या तक्रारी सोडविण्यासाठी राष्ट्रवादीच्या वतीने प्रामाणिकपणे प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यामुळेच या संवादाचे आयोजन करण्यात आले आहे.

शहरातील सोसायटीधारकांनी आपल्या समस्या घेऊन या कार्यक्रमाला उपस्थित रहावे. तसेच समस्या पाठविण्यासाठी मेल-आयडीही उपलब्ध करून देण्यात आला आहे. यामध्ये चिंचवडमधील सोसायटीधारकांना समस्या पाठविण्यासाठी [email protected] [email protected]

भोसरीतील समस्या [email protected] [email protected] [email protected] आणि पिंपरीतील समस्या [email protected] या मेल आयडीवर पाठवाव्यात, असे आवाहन शहराध्यक्ष गव्हाणे यांनी केले आहे.