अखेर नितेश राणे यांचा भाजपमध्ये प्रवेश   

0
551

सिंधुदूर्ग,  दि. ३ (पीसीबी) – बहुप्रतिक्षित आमदार नितेश राणे यांचा अखेर  भाजपमध्ये प्रवेश   झाला. भाजप जिल्हाध्यक्षांच्या उपस्थितीत नितेश राणे यांनी  कणकवलीत आज (गुरूवार) भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे राणेंना भाजपची उमेदवारी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

नितेश राणे यांच्या भाजप प्रवेशावेळी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांचा यात मोठ्या प्रमाणात समावेश होता. भाजप कार्यालय  नारायण राणे यांच्या घरापासून अवघ्या १०० मीटर अंतरावर आहे. विशेष म्हणजे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या आधी नितेश राणे यांचा भाजप प्रवेश झाला आहे.

दरम्यान, नितेश राणे आणि नारायण राणे यांच्या भाजपा प्रवेशाला शिवसेनेकडून मोठ्या प्रमाणात विरोध होता. अखेर भाजपने शिवसेनेचा विरोध डावलून भाजप आणि शिवसेनेची युती झाल्यानंतर नितेश राणे यांना भाजप प्रवेश दिला आहे. आता शिवसेनेकडून कोणती प्रतिक्रिया येते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.