भोसरीत गळा चिरून एकाचा खून

548

भोसरी, दि. १९ (पीसीबी) –
भोसरी येथे एका व्यक्तीचा गळा चिरून निर्घृणपणे खून करण्यात आला. ही घटना शनिवारी मध्यरात्री बारा वाजताच्या सुमारास जय गणेश साम्राज्य चौकाजवळ घडली.

दीपक वाघमारे असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी मध्यरात्री बारा वाजताच्या सुमारास एका व्यक्तीने दीपक वाघमारे यांच्या गेल्यावर धारदार शस्त्राने मारून खून केला. याबाबत माहिती मिळाली असता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे.

आरोपीचे नाव अद्याप निष्पन्न झाले नाही. भोसरी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.