शरद पवारांनी काँग्रेस सोडली तेव्हा ते कावळे होते का? – खा. संजय काकडे

0
425

मुंबई, दि. २० (पीसीबी) – आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्ष सोडणाऱ्या कावळ्यांची चिंता करायची नाही तर मावळ्यांची चिंता करावी, असे विधान केले होते. यावरून भाजपचे सहयोगी सदस्य व राज्यसभा खासदार संजय काकडे यांनी टीका केली आहे . जेव्हा शरद पवार यांनी दोनदा काँग्रेस सोडली तेव्हा ते कावळे होते का? असा सवाल काकडे यांनी उपस्थित केला .

शरद पवार यांच्यासारखा जेष्ठ नेत्याने अशी वक्तव्ये करणे खरे तर अपेक्षित नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून असलेले विजयसिंह मोहिते पाटील, पिचड, गणेश नाईक यांच्यासह अनेक नेते राष्ट्रवादीला रामराम करून भारतीय जनता पक्षात का आले यावर पवारांनी आत्मचिंतन करावे. आपल्या पक्षाच्या हितासाठी वीस वर्षे बरोबर राहिलेली माणसे आता दूर का जातायत हे त्यांनी तपासून पहावे. तसेच राष्ट्रवादीतील ज्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्या नेत्यांना भाजप पक्षात कधीच प्रवेश देणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले असल्याचेही काकडे म्हणाले .