भाजप-शिवसेना विधानसभा एकत्र लढणार; शहा – फडणवीसांच्या भेटीत शिक्कामोर्तब

0
384

मुंबई, दि. २० (पीसीबी) – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची दिल्ली येथे भेट घेतली. या भेटीमध्ये विधानसभा निवडणूक भाजप-शिवसेना एकत्र लढणार यावर शिक्कामोर्तब झाले  आहे.

विधानसभेसाठी शिवसेनेसोबत जागावाटप लवकरच पूर्ण करा. राज्यातील दोन्ही नेतृत्वाने चर्चा करून ठरवावे, अशा सूचनाही अमित शाह यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिल्या आहेत, सूत्रांच्या माहितीनुसार अमित शाह यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीचा आढावाही घेतला आहे .

लोकसभा निवडणुकीत भाजप -शिवसेनेने हातमिळवणी करत सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत . २०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेची युती तुटली. यानंतर शिवसेना सुरुवातीला विरोधी पक्षात बसली. मग पुन्हा एकदा भाजपसोबत युती झाल्यानंतर शिवसेना सत्तेत आली. यानंतरही दोन्ही पक्षांमध्ये वारंवार वाद झाले. या दोन्ही पक्षातल्या वादाने टोक गाठल्यानंतर लोकसभा निवडणुकीसाठी युती होणार नाही, असे वाटत होते.

पण अमित शाह मातोश्रीवर आले आणि लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीसाठी युती करण्याचा निर्णय झाला. विधानसभा निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांना समना संधी मिळतील, असे दोन्ही पक्षांचे नेते सांगत आहेत. पण विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाचा नेमका फॉर्म्युला काय आहे? हे मात्र अद्यापही समोर आलेला नाही.