मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या पुतण्याला ईडीने केले अटक

0
378

भोपाल, दि. २० (पीसीबी) – मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचा पुतण्या आणि मोझरबेअर कंपनीचा माजी कार्यकारी संचालक रतुल पुरी याला सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) अटक केली आहे. त्याच्यावर ३०० कोटींपेक्षा अधिक रकमेच्या घोटाळ्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

या प्रकरणात रतुल पुरी, त्याचे वडिल दिपक पुरी, आई निता पुरी, संजय जैन, विनित शर्मा आणि कंपनी एमबीआयएलविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यांच्यावर फसवणूक, कथितरित्या गुन्हेगारीचा कट आणि भ्रष्टाचारासारखे आरोप ठेवण्यात आले आहेत.

दोन दिवसांपूर्वीच रतुल पुरी आणि अन्य दोन जणांविरोधात खटला दाखल करण्यात आला होता. सेट्रल बँक ऑफ इंडियाकडून ३५४ कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने १४ ऑगस्ट रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान रतुल पुरीला २० ऑगस्ट पर्यंत अटकेपासून संरक्षण दिले होते. परंतु आज (मंगळवार) त्याला अटक करण्यात आली. सीबीआयने सोमवारी त्यांच्या सहा ठिकाणांवर छापे टाकले होते. यापूर्वी ३ हजार ६०० कोटी रूपयांच्या ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणातही रतुल पुरीचे नाव आले होते.