उद्योगात अशा गोष्टींना तोंड द्यावंच लागते – मनोहर जोशी

0
589

मुंबई, दि. १९ (पीसीबी) – ‘कोहिनूर स्क्वेअर’मधील कथित आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे व कोहिनूर ग्रुपचे उन्मेष जोशी यांना नोटीस बजावली आहे. उन्मेष हे शिवसेनेचे नेते व माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे पुत्र आहेत . या प्रकरणावर मनोहर जोशी यांनी प्रतिक्रिया दिली. ‘उद्योग-व्यवसायात उतरले की अशा प्रकारच्या गोष्टींना तोंड द्यावेच लागते,असे ते म्हणाले .

नोटीस मिळाल्यानंतर उन्मेष यांनी आज ईडीच्या अधिकाऱ्यांसमोर हजेरी लावली. तब्बल दोन तासांहून अधिक वेळ त्यांची चौकशी सुरू आहे. पूर्वी मी संस्था पाहत होतो. तेव्हा असे काही झाले नव्हते. आता काही आहे का ते पाहावे लागेल. अचानक नोटीस येण्यामागे कदाचित काही काळंबेरे असूही शकते, असेही मनोहर जोशी म्हणाले . तसेच उन्मेष जोशी यांनीही मी ईडीला पूर्ण सहकार्य करण्यास तयार असल्याचे म्हटले आहे.