बेरोजगारांचे तांडे आज महाराष्ट्रात नाक्यानाक्यावर पाहायला मिळत आहे – अमोल कोल्हे

0
417

मुंबई, दि. १९ (पीसीबी) – बेरोजगारांचे तांडे आज महाराष्ट्रात नाक्यानाक्यावर पाहायला मिळत आहे. हे सगळे घडत असताना सत्ताधारी भाजप सेनेचे यात्रा काढतातच कशा हे लोकांनी त्यांना विचारायला हवे , असे वक्तव्य राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी केले आहे . तरुणांनो तुमच्या आयुष्याचा खेळखंडोबा सुरु आहे, तुमच्या भविष्यावर वरवंटा फिरवला जातोय ही बाब सगळ्यांनी लक्षात घ्या असे आवाहनही त्यांनी तरुण पिढीला केले .

पाच वर्षांत पैठण तालुक्यातील एमआयडीसी मध्ये उद्योग धंदे आले का? . किती मुलांना रोजगार मिळाला असा सवालही डॉ. अमोल कोल्हे यांनी केला. १ लाख ४२ हजार कंपन्या बंद झाल्या आहेत. आजचा शिक्षित तरुण घरी बसला आहे . बेरोजगारीच्या नैराशेने त्यांना ग्रासले आहे . सत्तेत येण्यापूर्वी मोदी सरकारने तरुण पिढीला नौकरी देण्याचे आश्वासन दिले .मात्र ते अद्यापही पूर्ण केले नाही, असेही कोल्हे म्हणाले .