RBI कडून नाबार्डला २५ हजार कोटी, एनएचबीला १० हजार कोटी , सीडबीला १५ हजार कोटी तर मायक्रो बँकिंगसाठी ५० हजार कोटींची मदत जाहीर

0
327

नवी दिल्ली,दि.१७(पीसीबी) – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर RBI कडून नाबार्डला २५ हजार कोटी, एनएचबीला १० हजार कोटी , सीडबीला १५ हजार कोटी तर मायक्रो बँकिंगसाठी ५० हजार कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे.

सध्या मानवतेवर कोरोनाची संकट आलेलं आहे. तसंच अर्थव्यवस्थेवर देखील कोरोनाचा मोठा परिणाम झाला आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेवर आरबीआयची नजर असल्याचं आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांता दास यांनी म्हटलं आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. रिव्हर्स रेपो रेट ४ टक्क्यांवरून ३.७५ टक्क्यावर आल्याचं त्यांनी सांगितलं.

दरम्यान जगातल्या प्रमुख देशांच्या अर्थव्यवस्थेवर कोरोनाचा परिणाम झाला आहे. त्यांच्या तुलनेने भारताची स्थिती चांगली आहे. कोरोना संकटाचा जगभरातील मार्केटवर परिणाम झाला आहे. ऑटोमोबाईल्स क्षेत्रात विक्रीमध्ये मोठी घट झाली आहे. मंदीच्या संकटाशी लढण्यास आरबीआय प्रयत्न करत असल्याचं ते म्हणाले.