लाव रे तो व्हिडीओ , त्यामुळेच राज ठकारे यांना ईडीची नोटीस – धनंजय मुंडे

0
397

वाशिम, दि. २० (पीसीबी) – शिवस्वराज्य यात्रा माझ्या मराठवाड्यात दाखल होत आहे. माझ्या माय-भगिनी स्वयंस्फूर्तीने औक्षण करून आमचे स्वागत करत आहेत. या बाबांनी घातलेला हार मला विजयमाला सारखा भासला. तुमच्या सर्वांचे आशीर्वाद पाठीशी असताना शिवस्वराज्य येणार याची मला खात्री आहे. असा विश्वास राष्ट्रवादीचे नेते धंनजय मुंडे यांनी ट्विटच्या माध्यमातून व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेला सोमवारपासून सुरुवात झाली असून,आज दुसऱ्या दिवशी वाशीम जिल्ह्यात दाखल झाली.

दरम्यान, कंवरी भोकरदन येथे आयोजित सभेत मुंडे यांनी भाजप-शिवसेनेवर जोरदार फटकेबाजी केली. लोकसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठकारे लाव रे तो व्हिडीओ म्हणायचे, तेव्हा भाजपच्या भल्याभल्यांची टरकायची. त्यामुळेच राज ठाकरे यांना आज ईडीची नोटीस बजावली आहे. भाजपविरोधात आवाज केला तर आवाज दाबला जातोय. त्यामुळे माझ्यासारख्या सर्वसामान्याला देशात लोकशाही जिवंत आहे की नाही? असा प्रश्न पडत असल्याचे, धनंजय मुंडे यावेळी म्हणाले.