एक लाखाची ऑनलाईन फसवणूक, दोन महिन्यानंतर गुन्हा दाखल

0
590

चिंचवड, दि. २७ (पीसीबी) – बँक कर्मचारी बोलत असल्याचे भासवून चिंचवडमधील एकाचा विश्वास संपादन केला. त्यानंतर डेबिट कार्ड सुरू करण्यासाठी ओटीपी नंबर घेऊन बँक खात्यातून १ लाख ८ हजार ४७६ रूपये काढून घेतले. ही घटना १४ मे रोजी घडली. मात्र, शुक्रवारी (दि. २६) याप्रकरणी चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

याबाबत रूपेशकुमार श्रीबिरंचीप्रसाद बर्नवाल (वय ३६, रा. कृष्णानगर, इनकमटॅक्स कॉलनी, चिंचवड) यांनी फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रूपेशकुमार यांना ८०१६४३१४७७ या क्रमांकावरून फोन आलेल्या व्यक्तीने तो बँक कर्मचारी बोलत असल्याचे भासवून त्यांचा विश्वास संपादन केला. तुमचे डेबिट कार्ड बंद असून ते सुरू करण्यासाठी तुमच्या मोबाईलवर एसएमएसच्या माध्यमातून येणारा ओटीपी नंबर रूपेशकुमार यांना सांगण्यास सांगितले. काही वेळाने रूपेशकुमार प्राप्त झालेला ओटीपी फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीला सांगितला, असता त्यांच्या बँक खात्यातून पैसे काढून घेतले गेले.

दरम्यान, कोणत्याही बँकेतून अशा प्रकारे फोन केले जात नाहीत. ही बाब अनेकदा बँकांकडून स्पष्ट करण्यात आली. मात्र, नागरिक त्याकडे दुर्लक्ष करतात.