मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांवर गुन्हा दाखल करण्याची नाना पटोलेंची मागणी

0
437

मुंबई, दि. ९ (पीसीबी) – मागील पाच दिवसापासून राज्यात पावसाने थैमान घातले आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्र पुराने वेढला आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर येथे तर पुराने हहाकार केला आहे. शेकडो लोक बेघर झालेत. येथे पुरामुळे जीवीतहानी आणि वित्तहानी झाली आहे. या शहरातील पूरपरिस्थितीवर मात करण्यास राज्य सरकारकडून दुर्लक्ष केल्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर मंत्र्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी केली आहे.

सांगली आणि कोल्हापूर शहरात पुरस्थिती अजूनही नियंत्रणात नाही. गेले चार दिवसापासून पुराच्या पाण्यामुळे इथे लोक मदतीसाठी आकांत करत आहेत. शिवाय काही वेळासाठी येथे पावसाने उसंतदेखील घेतली होती तेव्ही प्रशासनाकडून योग्य पाऊल उचलल्या गेले नाही. सरकारने वेळेत उपाययोजना केल्य़ा असत्या तर ही परिस्थिती ओढवली नसती असे नाना पटोले यांनी म्हटले. मंत्र्यांच्या हलगर्जीपणामुळे आणि प्रशासनाच्या दिरंगाईमुळे कोल्हापूर सांगली करांना जीव गमवावा लागला. तसेच परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर सरकारला जाग आला असेही नाना पटोले म्हणाले आहेत.