MG मोटर्सची ‘हेक्टर’ येतेय; ‘हॅरियर’ पुढे आव्हान

0
426

मुंबई, दि. १५ (पीसीबी) – बहुप्रतिक्षीत एमजी मोटर्स कंपनीची भारतातील पहिली एसयूव्ही ‘एमजी हेक्टर’ची लवकरच जुनअखेरपर्यंत बाजारात दाखल होणार आहे. या इंटरनेट कारच्या वैशिष्ट्यांबाबत चर्चा झाली. या कारची किंमत टाटा हॅरियर, महिंद्रा एक्सयुव्ही ५०० या कारएवढी असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे लक्झरी एसयुव्ही कारमध्ये तीव्र स्पर्धा रंगणार आहे.

एमजी हेक्टरने तुर्तास भारतात पाच आसनी कार लाँच करत आहे. पुढील वर्षी २०२० पर्यंत सात आसनी कार लाँच करणार आहे. एमजी हेक्टर भारतात लाँच झाल्यानंतर ही एसयुव्ही इतर लक्झरी एसयु्व्हीला स्पर्धा करणार असल्याचे स्पष्ट झाले होते. एमजीने आपल्या कारची किंमत कमी ठेवून इतर कार कंपन्यांना आव्हान निर्माण केले आहे.

टाटा हॅरियर आणि कॉम्पास या कारमध्ये असणाऱ्या डिझेल इंजिनप्रमाणे हेक्टरमध्ये इंजिन असणार आहे. हेक्टर १.५ लिटर पेट्रोल इंजिनासह उपलब्ध असणार आहे. हेक्टर स्टाइल, सुपर, स्मार्ट आणि शार्प या चार वेरिएंटमध्ये उपलब्ध असणार आहे.

एमजी हेक्टरची पेट्रोल वेरिएंटची किंमत ही १३ ते २० लाखाच्या दरम्यान असणार आहे. महिंद्रा एक्सयुव्ही५०० ची किंमत १६.०९ लाख, जीप कॉम्पास १५.६ लाख ते २१.६७ लाख असणार आहे. तर, ह्युडांई टस्कॉनची किंमत १८.७५ लाख ते २३.७२ लाख असणार आहे.

डिझेल वेरिएंटमध्ये एमजी हेक्टरची किंमत १४ लाख ते १९.५ लाख असणार आहे. टाटा हॅरिअरची किंमत १३ लाख ते १६.५६ लाख असणार आहे. महिंद्रा एक्सयुव्ही ५०० ची किंमत १२.३१ लाख ते १७.४ लाख असणार आहे. जीप कॉम्पासची किंमत १६.६१ लाख ते २१.३३ लाख असणार आहे. ह्युडांई टस्कॉनची किंमत २०.७८ लाख असणार आहे.