रामराजे माझ्या वयाचे असते, तर जीभ हासडली असती – खासदार उदयनराजे

0
565

सातारा, दि. १५ (पीसीबी) – रामराजे वयाने मोठे आहेत, म्हणून मी शांत आहे, माझ्या वयाचे असते, तर जे काही बोलले त्याबद्दल जीभ हासडली असती, अशी  प्रतिक्रिया खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली आहे. तर रामराजेंनी एक लक्षात ठेवावे, मी काही बांगड्या भरलेल्या नाहीत उचलली जीभ आणि लावली टाळ्याला असे कुणीही करू नये.  जशास तसे उत्तर आम्हालाही देता येते. पण आमच्यावर तसे संस्कार नाहीत, असेही उद्यनराजे म्हणाले.  

नीरेच्या पाण्यावरून रामराजे निंबाळकर आणि उदयनराजे भोसले या दोघांत वाद  सुरू झाला आहे. पिसाळलेली कुत्री जोपर्यंत असतील, तोपर्यंत मी पिसाळलेलाच राहणार, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते रामराजे निंबाळकर यांनी खासदार उद्यनराजे यांच्यावर केली होती. या टीकेला उदयनराजे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

माझी तुलना पिसाळलेल्या कुत्र्याशी रामराजेंनी केली. त्यांच्यासारख्या मोठ्या माणसाला हे बोलणं शोभतं का? मी पिसाळतो, असे ते म्हणतात. होय ते लोकांची कामे झाली नाहीत, तर मला राग येतोच. मी कधीही कोणाचे वाईट चिंतलेले नाही. तरीही ते म्हणतात मी चक्रम आहे. लोकांवर अन्याय होत असेल, तर मी चक्रम होतोच, असेही उद्यनराजे यांनी म्हटले आहे.