लक्ष्मण मानेंनी स्थापन केली ‘महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडी’

0
496

पुणे, दि. 24 (पीसीबी) – वंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडलेले लक्ष्मण माने यांनी महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडी नावाचा नवीन पक्ष स्थापन केल्याचे जाहीर केले. राज्यातील डाव्या आघाडीच्या पक्षासह काम करणार असल्याचे त्यांनी कॅम्पमधील आरोरा टॉवरमध्ये बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

त्यावेळी जनता दलाचे (सेक्युलर) महासचिव व निवृत्त न्यायाधीश बी. जी. कोळसे-पाटील उपस्थित होते. काँगेस व राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर जागा वाटपबाबत चर्चा करणार असून शेकाप, स्वाभिमानी शेतकरी संघटना, संभाजी ब्रिगेड आपल्या बरोबर आहेत. येत्या 29 जुलैला बालगंधर्व रंग मंदिरात पक्षाचे उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी यांनी दिली.