#HyderabadEncounter:सेलिब्रिटींकडून कौतुकाचा वर्षाव

0
315

हैदराबाद, दि.६ (पीसीबी) -हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींना ठार करण्यात आले आहे. पोलीस एन्काऊंटरमध्ये हे चार आरोपी ठार झाले आहेत. या घटनेनंतर देशभरातून सोशल मीडियावर प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. बॉलिवूड सेलिब्रिटींनी तेलंगणा पोलिसांचे कौतुक केले आहे. ऋषी कपूर, अनुपम खेर, कंगना रणौतची बहिण रंगोली चंडेल यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिल्या आहेत.