#BoycottMyntra; ट्विटरवर #BoycottMyntra हॅशटॅग पुन्हा एकदा होतोय ट्रेंड; ‘हि’ वादग्रस्त जाहिरात ठरतेय कारणीभूत

0
278

नवी दिल्ली, दि.२३ (पीसीबी) : ट्विटरवर सातत्याने ट्रेंड बदलत असतात. ज्या गोष्टीवर जास्तीत जास्त चर्चा,पोस्ट होतात त्याच गोष्टी ट्रेंड करत असतात. गेल्या काही वेळापासून #BoycottMyntra हा ट्रेंड जोर धरत आहेत. @Hindutvaoutloud नावाच्या इन्स्टाग्राम पेजने सर्व ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली ज्यात उत्पादनाच्या जाहिराती आहेत. स्लाइडची सुरूवात एका जाहिरातीने होते. ज्यात भगवान श्रीकृष्ण मिंत्रा (Myntra) या शॉपिंग वेबसाइटवर लांब साडीसाठी ऑनलाइन खरेदी करताना दाखवले आहेत. तर या जाहिरातीच्या पार्श्वभूमीवर ‘द्रौपदी वस्त्रहरण’ होत आहे असं दाखवलं आहे. जाहिरात पाहून संतापलेल्या अनेकांनी ट्विटरचा वापर करून मिंत्रा या शॉपिंग वेबसाइटवर बहिष्कार टाकत असल्याचं सांगितलं आहे.

तथापि, नेटीझन्सनी “www.scrolldroll.com” हे फोटोवर एका छोट्या फॉन्टमध्ये लिहिलेले वाचलेच नसावे. ही जाहिरात जुनी आहे. या जाहिरातीमुळे २०१६ मध्ये वाद निर्माण झाला होता. तेव्हा लोकांनी गृहीत धरले होते की जाहिरात मिंत्रा ची आहे. परंतु, हे स्क्रोलड्रॉलचे एक पोस्ट होते, ज्यांमध्ये देव २१ व्या शतकातील तंत्रज्ञानाचा वापर करत असतील तर काय होईल? हे दाखवण्यासाठी अशी जाहिरात बनवली होती. त्या नंतर, मिंत्राने एक ट्विट देखील केले होते की ही जाहिरात त्यांच्याद्वारे प्रकाशित केली गेली नाही. ScrollDroll ने या जाहिरातीची जबाबदारी घेतली होती. आता आज २०२१ मध्ये पुन्हा एकदा ट्विटरवर ही जाहिरात व्हायरल झाली आहे. यामुळे नेटीझन्स मिंत्रावर बहिष्कार टाकत आहोत अशा कमेंट्स आणि पोस्ट केल्या आहेत.

मिंत्रा आज ट्रेंडमध्ये असलेल्या या विषयावर अजूनतरी बोललेले नाहीत.