कल्याणमध्ये सात वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

0
499

कल्याण, दि.२३ (पीसीबी) – कल्याणमध्ये सात वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुलीच्या शाळेजवळ असणाऱ्या एका जीर्ण आणि बंद पडलेल्या इमारतीत आरोपींनी जवळपास आठ महिने मुलीवर बलात्कार केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी याप्रकरणी तिघांना अटक केली आहे.

नवीन, , अजय, विक्रम पुरोहित  असे या आरोपींची नावे आहेत

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “मुलीच्या पालकांनी शाळेतून घरी येण्यासाठी रिक्षा भाड्याने घेतली होती. पीडित मुलगी शाळा सुटल्यानंतर रिक्षाची वाट पाहत शाळेबाहेर उभी असायची. नेमका याचाच फायदा आरोपी नवीन, अजय आणि विक्रम पुरोहित यांनी घेतला. नवीन याचे कपड्याचे दुकान असून अजय याचा केटरिंगचा व्यवसाय आहे. तर विक्रम हा बॅग विकण्याचा व्यवसाय करतो”. या घटनेमुळे शाळेबाहेर परिसरातील मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाला आहे. पीडित मुलीच्या आजीला वागण्यात बदल जाणवल्यानतंर ही घटना उघडकीस आली. आजीने मुलीकडे चौकशी केली असता तिने घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. शाळा सुटल्यानंतर तीन लोक आपल्याला निर्जनस्थळी खेळण्यासाठी घेऊन जातात असे मुलीने आजीला सांगितल्यानंतर त्यांना धक्काच बसला. त्यांनी तात्काळ आपला मुलगा आणि सुनेला या प्रकाराबद्दल सांगितले. मुलीच्या पालकांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेत याबद्दल तक्रार दाखल केली. तीनही आरोपींना अटक करण्यात आलेली असून त्यांच्यावर बलात्कारासहित पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती बाजारपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिलीप फुलपगारे यांनी दिली आहे. या प्रकरणी पोलिस तपास करीत आहे.