अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा पुतण्या रिझवान कासकरला मुंबई विमानतळावरुन अटक

0
552

मुंबई, दि. १८ (पीसीबी) – अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा पुतण्या रिझवान कासकरला खंडणीच्या आरोपा खाली मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने मुंबई विमानताळावरुन अटक केली आहे.

मुंबईतल्या दोन व्यापाऱ्यांमध्ये पैशाच्या देवघेवीवरुन वाद होता. यातील एका व्यापारी दुबईतील डी कंपनीच्या संपर्कात आला. त्यानंतर फहीम मचमच नावाच्या व्यक्तीला मदत मागितली होती. व्यापाऱ्याने फहीमच्या साथीने दुसऱ्या व्यापाऱ्याला धमकावल. तसेच त्यांना सर्व पैसे विसरुन जाण्यास सांगितले. त्यानंतर मुंबईतून अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा पुतण्या रिझवान कासकरने त्या व्यापाऱ्याला धमकवण्यासल सुरुवात केली. काही दिवसांनी त्या व्यापाऱ्याला दुबईत नेऊन वाद मिटवण्याचे आश्वासन रिझवानने दिले होते. मात्र या दरम्यान व्यापाऱ्याला आपले पैसे मिळणार नसल्याची शंका आल्याने त्याने थेट खंडणीविरोधी पथकाकडे तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी रिझवान याला अटक केली.