संतापजनक: पत्नीने पाणी न दिल्याच्या रागातून आठ महिन्याच्या बाळाची भिंतीवर आपटून हत्या

0
371

लखनऊ, दि. १८ (पीसीबी) – पत्नीने पाणी न दिल्याच्या रागातून एका निर्दयी पित्याने स्वत:च्या आठ महिन्याच्या मुलाची भिंतीवर आपटून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना मंगळवारी (दि.१६) रात्री दहाच्या सुमारास लखनऊच्या निगोहा येथे घडली.

सुरेंद्र साहू (वय ३०) असे निगोहा पोलिसांनी अटक केलेल्या आरोपी पित्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतप्त स्वभावाचा सुरेंद्र मंगळवारी रात्री घरी आला होता. यावेळी पत्नी लक्ष्मी दरवाजा उघडून घरामध्ये काम करण्यासाठी गेली. यावेळी सुरेंद्र याने त्याला पाणी न दिल्याच्या रागातून लक्ष्मीला बडबड करण्यास सुरुवात केली. रागाच्या भरात त्याने कॉटवर झोपलेल्या आठ महिन्यांच्या मुलाला उचलले आणि भिंतीवर आपटले. भिंतीला आपटून खाली पडल्यानंतर मूल रडत होते. त्या आवाजाने सुरेंद्र आणखी संतापला. त्याने पुन्हा मुलाला उचलले आणि जमिनीवर आपटले.

लक्ष्मीने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. पाय पकडून गयावया केली मात्र सुरेंद्रने काही एक ऐकले नाही आणि मुलाची हत्या केल्यानंतर फरार झाला. लक्ष्मीने मुलाला उठवण्याचा प्रयत्न केला. ती मुलाला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेले. पण डॉक्टरांनी मुलाला मृत घोषित केले. तर निगोहा पोलिसांनी सुरेंद्र याला काही तासातच अटक केली.