नगरमध्ये संग्राम जगतापांवर सुजय विखे भारी; ४७ हजार मतांनी आघाडीवर

0
455

अहमदनगर, दि. २३ (पीसीबी) – महाराष्ट्रातील लोकसभेच्या सर्व लढतींपैकी अहमदनगरमधील लढत सर्वाधिक चर्चेत आहे. अहमदनगरमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी-काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

अहमदनगरचे भाजपचे उमेदवार सुजय विखे-राटील पहिल्या फेरीत ४७ हजार मतांनी आघाडीवर आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संग्राम जगताप पिछाडीवर आहेत.

सुजय विखे आणि संग्राम जगताप यांच्यामध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. मात्र पहिल्या फेरीतील मतमोजणी पाहता सुजय विखे संग्राम जगताप यांच्यावर भारी पडत असल्याचे दिसत आहे.

अहमदनगर लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले असून संपूर्ण निकाल हाती आल्यावर खरे चित्र समोर येईल.