प्रकाश आंबेडकर सोलापूर आणि अकोला दोन्ही मतदारसंघातून पिछाडीवर

0
357

पुणे, दि. २३ (पीसीबी) – वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर हे सोलापूर आणि अकोला लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. मात्र ते या दोन्ही जागांवर पिछाडीवर आहेत.

सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे जयसिद्धेश्वर शिवाचार्य आघाडीवर आहेत. तर काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. आंबेडकर तिसऱ्या क्रमांकावर ढकलले गेले आहेत.

अकोल्यामध्ये भाजपचे संजय धोत्रे १९७३३ घेत आघाडीवर आहेत. तर आंबेडकर १३४५९ मतांनी दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आंबेडकर यांनी आघाडी-युतीसमोर आव्हान उभे केले आहे. त्यांनी महाराष्ट्रातील ४८ जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत.