महात्मा गांधी पाकिस्तानचे राष्ट्रपिता; भाजप प्रवक्त्याचे वादग्रस्त विधान

0
467

भोपाळ, दि. १८ (पीसीबी) – महात्मा गांधी राष्ट्रपिता होते, मात्र ते पाकिस्तानचे राष्ट्रपिता होते. भारतात त्यांच्यासारखे कोट्यवधी पूत्र आहेत. काही लायक तर काही नालायक.  महात्मा गांधी राष्ट्रपिता होऊ शकतात, मात्र ते पाकिस्तानचे राष्ट्रपिता असू शकतात. भारताचे पिता असणाऱ्याचा आजवर कोणाचा उल्लेख नाही, असे वादग्रस्त विधान भाजपचे मध्य प्रदेशमधील प्रवक्ते अनिल सौमित्र यांनी केले आहे.

अनिल सौमित्र यांनी आपल्या फेसबुकवर हे वादग्रस्त विधान पोस्ट केले आहे.  याबाबत भाजपचे मध्य प्रदेशमधील मीडिया विभाग प्रमुख लोकेंद्र पाराशर यांनी सांगितले की, भाजपच्या विचारसरणीच्या विरोधात वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष राकेश सिंह यांनी त्यांच्याविरोधात शिस्तभंगाची कारवाई केली आहे. या वक्तव्याप्रकरणी सौमित्र यांची प्राथमिक सदस्यता रद्द करत निलंबन करण्यात आले आहे. तसेच  त्यांच्याकडून  स्पष्टीकरण मागितले आहे.

आम्ही महात्मा गांधींच्या विचारांना पंच-निष्ठेने स्वीकारले आहे. त्यांच्या रामराज्याचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेन वाटचाल करत आहोत. स्वच्छतेचा त्यांचा विचाराला आम्ही राष्ट्रीय ध्येय बनवले. मात्र काँग्रेसने काय केले? कट रचून नकली गांधी विकसित केले आणि गांधी नावाचा वापर केला. पिढ्यांपिढ्या गांधी नावाचा वापर करुन मते विभागली आणि सत्ता मिळवली. त्यामुळे गांधीजींच्या विचारांचा हत्यारा कोण आहे? राजकारण आणि षड्यंत्र करणाऱ्यांनी महात्मा गांधींच्या विचारांची हत्या केली, असा आरोप अनिल सौमित्र यांनी केला आहे.