जम्मू-काश्मीर येथील शोपियामध्ये पोलीस स्टेशनवर दहशतवादी हल्ला; एक पोलीस शहीद

0
490

जम्मू, दि. ३० (पीसीबी) – दक्षिण काश्मीरमधील शोपिया जिल्ह्यातील एका पोलीस स्टेशनवर आज (रविवारी) सकाळच्या सुमारास दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात एक पोलीस कर्मचारी शहीद झाल्याचे वृत्त आहे. या हल्ल्यानंतर दहशतवादी फरार झाले. दरम्यान, सुरक्षा रक्षकांनी संबंधीत पोलीस स्टेशनच्या संपूर्ण परिसराला वेढा दिला आहे. दहशतवाद्यांचा शोध घेण्यात येत आहे.