पिंपरीतून १२ वर्षीय मुलगा बेपत्ता

0
470

पिंपरी, दि. ३० (पीसीबी) – बाहेर जाऊन येतो असे सांगून पिंपरीतील रिव्हर रोड येथे राहणाऱ्या १२  वर्षीय अल्पवयीन मुलगा  शनिवारी (दि.२९) दुपारी साडेबाराच्या सुमारास बेपत्ता झाला आहे.

शमीम रमजान खान (वय १२, रा. लक्ष्मी धर्मशाळा, सिमेंटच्या दुकानाजवळ, रिव्हर रोड, पिंपरी. मूळ रा. बीजावार, जि. छत्तरपूर, मध्यप्रदेश) असे या बेपत्ता मुलाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शमीम मध्यप्रदेशमधील बिजावार येथील रहवासी आहे. तो पिंपरी येथे त्याच्या मावशीजवळ गेल्या आठ महिन्यांपासून राहत होता. त्याच्या मावशीच्या पतीचे पिंपरी येथे कापड्याचे दुकान आहे. तो दुकानात देखील सारखा जात येत होता. शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास तो बाहेर जाऊन येतो असे सांगून घराबाहेर पडला. मात्र रात्री उशिरापर्यंत घरी परतलाच नाही. यामुळे रात्री साडेअकराच्या सुमारास इम्रानखान जहूर खान यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. दरम्यान शमीमबाबत कोणालाही माहिती मिळाल्यास त्याने त्वरीत पिंपरी पोलीसांच्या (०२०-२७४७२२१८) या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.  पिंपरी पोलीस अधिक तपास करत आहेत.