गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सराफ बाजारात बाप्पाच्या सोन्याच्या दागिन्यांना मोठी मागणी

bpcauthor
1 Min Read

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सराफ बाजारात बाप्पाच्या सोन्याच्या दागिन्यांना मोठी मागणी मिळत आहे. सोन्याचे हार, मोदक, पादुका, मुकुट, कानातील बाळी, गणेशमूर्ती आणि जास्वंदाच्या फुलांसारख्या आकर्षक अलंकारांना ग्राहकांकडून विशेष पसंती दिली जात आहे.

गणेशोत्सवाच्या पहिल्या पाच दिवसांत मुंबईच्या सराफ बाजारात सुमारे ₹१,५०० ते ₹२,००० कोटींची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे. गणेश चतुर्थीपासून विसर्जनापर्यंत ही उलाढाल आणखी वाढून एकूण ₹४,००० कोटींपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेषतः हलक्या वजनाच्या आणि आकर्षक नक्षीकाम असलेल्या दागिन्यांची मागणी वाढताना दिसत आहे.

Share This Article