वाकड परिसरात वाहनावर दिशाभूल करणारे चिन्ह वापरून लोकप्रतिनिधी असल्याचा गैरसमज निर्माण केल्याच्या आरोपावरून दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

PCB Admin
0 Min Read


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पार्क स्ट्रीट सोसायटीजवळ वाहन तपासणी सुरू असताना काळ्या रंगाच्या कारच्या मागील काचेवर पांढऱ्या आणि हिरव्या रंगाचे वर्तुळाकार चिन्ह आढळले. संबंधित व्यक्ती किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणीही विधानसभा सदस्य नसतानाही हे चिन्ह वापरल्याचा आरोप आहे.

याप्रकरणी वाकड पोलिसांनी कारमालकासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Share This Article