ई-केवायसी न केलेल्या कर्मचाऱ्यांचे वेतन रोखण्यात येणार..

PCB Admin
1 Min Read

शालार्थ प्रणालीद्वारे वेतन घेणाऱ्या राज्यातील अनुदानित, खासगी अनुदानित तसेच जिल्हा परिषदांच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आता अनिवार्य करण्यात आले आहे.

ई-केवायसी न केलेल्या कर्मचाऱ्यांचे ऑगस्ट २०२६चे, सप्टेंबरमध्ये अदा होणारे वेतन रोखण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. २८ जुलै २०२६ रोजी वित्त विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत शालार्थ प्रणालीतील सर्व संबंधित कर्मचाऱ्यांची ई-केवायसी तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.

Share This Article