३१ ऑक्टोबरनंतर दुष्काळ जाहीर करणार – चंद्रकांत पाटील

0
419

सांगली, दि. २१ (पीसीबी) – राज्यातील बहुतांश जिल्हे भीषण दुष्काळाच्या सावटाखाली आहेत. या पार्श्वभूमीवर ३१ ऑक्टोबरनंतर दुष्काळ जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी येथे दिली. तसेच राज्यातील तब्बल १७२ तालुक्यात दुष्काळ जाहीर करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

जतमध्ये ग्रामीण रुग्णालयाच्या भूमिपूजन कार्यक्रम आणि भाजप कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चंद्रकांतदादा बोलताना म्हणाले की, यावर्षी  भीषण दुष्काळाची महाराष्ट्राला झळ बसत आहे. लवकरच दुष्काळ  जाहीर करणार असल्याचे ते म्हणाले.

ज्या तालुक्यात ३१ टक्के पेक्षा दुष्काळ असेल, त्याच तालुक्यात दुष्काळ जाहीर करणार  आहे, असे  चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले. तसेच ज्या भागात दुष्काळ जाहीर केला आहे. त्या भागात काही सवलती त्यांनी जाहीर केल्या जातील. पण या  गोष्टी ३१ ऑक्टोबर नंतरच जाहीर केल्या जातील, असेही पाटील म्हणाले.