राधाकृष्ण विखे- पाटलांच्या पुत्रासाठी काँग्रेसला हवी अहमदनगर लोकसभेची जागा

0
382

मुंबई, दि. २१ (पीसीबी) – विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील लोकसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत  आहेत. त्यासाठी काँग्रेसने अहमदनगरची जागा मागितली आहे.  तर राष्ट्रवादीने काँग्रेसकडे पुणे आणि उत्तर-मध्य मुंबईची जागा मागितली आहे. त्याचबरोबर  राष्ट्रवादीने ५०-५० टक्के जागावाटपाची मागणी केली आहे.